उद्या पुन्हा आरसा मला पाहणार आहे
काही लिहितो आणि मग पुन्हा मिटवून देतो,
काही काही विचार करून स्वतःलाच रुसवून देतो.
स्वहासाठी लिहिणे किती सोपे होते पहिले,हे लक्षात येताच गाल फुगवून देतो.
फुगलेला स्वतःला पाहून परत हसून घेतो.
उद्या पासून असे नाही करणार, हा विचार नाही व्यसन झालाय
स्वतः बद्दल इतका होकार देवून, भरपूर दा फसवून झालाय.
फसवणूक झाल्यासारखी वाटते, कुठेतरी माझ्यात
बघतो स्वतःकडे आणि विचारतो आरास्यातला मी, कि मी आरास्यात
पण स्वतःबद्दल आणि कुणाला विचारू
आरास्यात नाही तर, स्वतःला कुठे पाहू
बहुतेक घासून घासून जुना झाला तो, नि त्यालाही तडा जावून राहिला
पण मला सोडून तर दुसऱ्यांना तो बरोबर दाखवून राहिला.
बुचकळ्यात पडलो विचार करता, कि तडा पडलाय कोणाला आरश्याला कि मला
किती सही झाला असतं, कि पेशाने आरास्यासोबत मीही आलो असतो नवा
विचार करता मन पुन्हा गारद होते,
कि लहानपणी पहिले आल्यावर हेच मन किती सावध होते,
येत होते विचार कि काय काय होवू शकतो आपण मोठे होवून,
आणि या मोठ्या जगावर आपले लहानशे पाय उमटून.
पण मनात आजही या गोष्टी रुततात,
आणि फक्त बोलणारा नाही मी, याच गोष्टी कानावर पडतात.
आजही रात्र संपणार आहे, मन पुन्हा निवांत होणार आहे.
पाहू उद्या पुन्हा येणारा सूर्य उजेड कि अंधार आणणार आहे,
कारण उद्या पुन्हा मी आरसा, नाहीतर आरसा मला पाहणार आहे.
work of fiction
ReplyDeletegood work
ReplyDeleteमेरे ज़ावेद अख्तर
आपके अल्फाज़ में जो तस्वुर है उसकी पराकाष्टा हमारे दिल तक पहुच चुकी है|
keep it up
रोजचा चेहरा आज पुन्हा फुगलेला दिसतो ,
ReplyDeleteवजा का होईना पण काही बदल दिसतो ,
watat aahe मनात काही चुकते तरी कुठे ,
साधे सुधे आरसे खोटे बोलतात तरी कुठे....